जांबुर्डे येथे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन

मुरबाड,दि.२१(वार्ताहर)-तालुक्यातील म्हसा पंचक्रोशीतील सिद्धगडाच्या पायथ्याशी वसलेल्या मौजे जांबुर्डे या गावी सालाबादप्रमाणे यंदाही बुधवार २२ फेब्रुवारीपासून अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जांबुर्डे गावातील ज्येष्ठ नागरिक दिवंगत ह.भ.प. पांडुरंग बुवा भोपी यांची पवित्र स्मृती जागवत ग्रामस्थ मंडळ, जांबुर्डे व परिसरातील गावे व नागरिकांच्या सहकार्याने गेली वीस वर्ष अखंडपणे सुरू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात बुधवार २२ फेब्रुवारीपासून होत असून सांगता सोहळा २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान, दैनंदिन श्रीग्रंथराज ज्ञानेेशरीचे सामुदायिक पारायण, पहाटे काकडा, सायंकाळी प्रवचन, हरिपाठ रात्री किर्तन व त्यानंतर परिसरातील भजनी मंडळांचे संगीत जागर भजन असे नित्याचे कार्यक्रम होणार आहेत. त्यात कलश व विणापूजन हभप मोरेेशर पाटील आणि रघुनाथ बुवा मार्के यांचे हस्ते होणार आहे. २४ तारखेला सांयकाळी पालखी सोहळा व २५ तारखेला वासुदेव महाराज पाटील मांगरुळकर यांचे काल्याचे किर्तन होऊन सांगता होईल तरी परिसरातील भाविक भक्तजन व नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ, घ्यावा असे ग्रामस्थ मंडळ जांबुर्डे यांनी केले आहे.