खारबाव येथे दाखले वाटप आणि विद्यार्थ्यांचा गौरव

भिवंडी,दि.२०(वार्ताहर)-तालुक्यात शिक्षणनगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या खारबाव ग्राम पंचायतीच्या वतीने विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले एका छताखाली उपलब्ध व्हावेत या उद्देशाने खारबाव ग्राम पंचायतीचे माजी उपसरपंच अशोक पालकर आणि ग्रामपंचायत सदस्य मनोज म्हात्रे यांच्या प्रयत्नांनी जिल्हा परिषद शाळा खारबाव येथे शैक्षणिक दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी हजेरी लावली होती. ग्राम पंचायतीच्या सरपंच वैशाली पाटील, उपसरपंच कमलाबाई जाधव, ग्राम विकास अधिकारी बी. बी. पाटील सदस्या कल्पना पाटील, माजी सरपंच अपर्णा म्हात्रे, सदस्या उषा पाटील, सदस्य रमेश कारभारी, खारबाव मंडळ अधिकारी महेश चौधरी, तलाठी एल. के. जाधव, कारिवली तलाठी काटसकर, खोणी तलाठी विशे यांच्यासह खारबाव मंडळ अधिकारी कार्यक्षेत्रातील तलाठी आणि तलाठी कार्यालयातील कर्मचार्‍यांनी या शिबिरास विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमात खारबाव गावातील विद्यार्थ्यांनी दहावीत विशेष प्राविण्य मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. हॉली मेरी शाळेचा विद्यार्थी हिमांशू वतारी ९४ टक्के गुण, पद्मश्री विद्यालयातून ९३ टक्के गुण मिळविणार्‍या कौशल वतारी, राहुल तरे ८० टक्के, ईेशरी चौधरी ८० टक्के, जयकोजी अवचार ८० टक्के तर सीबीएससी बोर्डात ८८ टक्के गुण मिळविणार्‍या तेजस पाटील यांचा विशेष सत्कार श्री साई सामाजिक आणि शैक्षणिक संस्था खारबावचे अध्यक्ष अशोक पालकर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. खारबाव मंडळ अधिकारी महेश चौधरी यांनी या कार्यक्रमाचे आणि आयोजकांचे कौतुक करीत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.