ओखीबद्दल भिवंडीत तातडीच्या सुविधा

भिवंडी,दि.6(वार्ताहर)-ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसल्यास आपत्कालीन स्थिती उद्भवू नये आणि उद्भवल्यास काय दक्षता घेणे आवश्यक आहे याचा विचार करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी विभाग प्रमुखांची तातडीची बैठक घेतली. खाडीकिनारी दवंडी पिटवून चक्री वादळाबाबत सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात येणार आहे. अती धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या प्रभाग अधिकार्‍यांना तातडीने कारवाई करण्यास सांगण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीची व्यवस्था म्हणून उपाययोजना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी दिली.