एलआयसी ठाणे विभागीय कार्यालयाची उत्तुंग भरारी

ठाणे,दि.12(वार्ताहर)-आर्थिक वर्ष 2017-18 साठी विमा व्यवसायाचे प्रथम विमा हप्ता उद्दिष्ट 617 कोटी रुपये पार करून ठाणे विभागाने नवीन किक्रम प्रस्थापित केला आहे अशी माहिती वरिष्ठ विभागीय प्रबंधक पुनीतकुमार यांनी दिली. गतवर्षीच्या 611.80 कोटींचे आतापर्यंतचे सर्वाधिक विमा हप्त्याचे रेकॉर्ड मोडून 617 कोटी रुपयांचा उच्चांक गाठून विक्रम घडवला आहे. या कामात मार्केटिंग मॅनेजर राधिका आळशी, सेल्स मॅनेजर श्री.नलावडे आणि श्री.जोशी तसेच विभागीय आणि शाखा कार्यालयात कार्यरत सर्व अधिकारी, विकास अधिकारी, विमा प्रतिनिधी आणि कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. या प्रसंगी आर्थिक वर्षात (2018-19) मध्ये अधिक मेहनतीने रुपये 617 कोटींचा विक्रम मोडण्याचा निर्धार ठाणे विभागाने केला आहे.