उल्हासनगर स्थानक कार्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

उल्हासनगर, दि.६(वार्ताहर)-दीनदिलतांचे उद्धारकर्ते, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६१वा महापरिनिर्वाण दिन उल्हासनगर रेल्वे स्थानकातील स्थानकप्रमुख मनोहर पाटील यांच्या कार्यालयात साजरा करताना सर्वानी अभिवादन केले. यावेळी मनोहर पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव, सचिव शाम उबाळे, अनंता ढोणे, रुग्णमित्र भरत खरे, रेल्वे युनियनचे सुहास देशमुख, अमर चव्हाण, कोकण प्रवाशी संघटना अध्यक्ष मुरलीधर शिर्के, पत्रकार मनोज रावल, पद्मिनी राजपूत, कैलास झालटे, अनिल मराठे, प्रा.प्रकाश माळी या सर्वांनी मेणबत्ती पेटवून महामानव यांना अभिवादन केले.