अंबरनाथला शासकीय दाखले वाटप शिबिराला प्रतिसाद

अंबरनाथ,दि.२२(वार्ताहर)-अंबरनाथला शिवसेना शाखेच्या वतीने विविध प्रकारच्या शासकीय दाखले वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दाखले मिळावेत यासाठी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची एकच गर्दी झाली होती. आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या संकल्पनेतून आणि खा.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी विद्यालयात झालेल्या शिबिरात तहसिलदार प्रशांत जोशी, नायब तहसिलदार विजय तळेकर, श्री.सांवत, कल्याण जिल्हा उपप्रमुख चंद्रकांत बोडारे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, नगराध्यक्षा प्रज्ञा बनसोडे, उप नगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर आदींच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, वय, राष्ट्रीयत्व व अधिवास दाखला इ.प्रकारचे दाखले देण्यात आले. सर्वच मंडळ अधिकारी, तलाठी, महसुल विभागातील इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग, सेतु केन्द्रातील कर्मचारी तसेच अंबरनाथ तालुका महा-ई सेवा केन्द्राचे संचालक यांच्या सहकार्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. असंख्य नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.