Welcome to Thane Vaibhav

जमीन हस्तांतरणाला वेग; ठाण्याची कोंडी फुटणार !

ठाणे,दि.16(वार्ताहर)-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील विविध प्रलंबित प्रकरणे, विशेषतः प्रकल्पांना आवश्यक जमिनींचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि ठामपा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

आणखी वाचा

No front page content has been created yet.

कल्याण-डोंबिवलीची होणार कचराकोंडी

कल्याण,दि.16(वार्ताहर)-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 400 कंत्राटी सफाई कामगार आणि घंटागाडी वाहन चालकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. ठेकेदाराने तीन महिने पगारच दिला नसल्याने उद्या बुधवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

कल्याणात लेप्टोने घेतला दुसरा बळी !

कल्याण,दि.4(वार्ताहर)-काही दिवसापूर्वी टिटवाळ्यात एका महिलेला लेप्टोस्पायरोसिस या आजाराने जीव गमवावा लागला होता. यानंतर कल्याणात या आजाराने दुसरा बळी घेतला आहे. ज्योती यादव (14) असे या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

‘अंकुर’ला मिळाला आजी-आजोबांचा आशीर्वाद

डोंबिवली,दि.३१(वार्ताहर)-आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून समाजसेवा करण्याच्या उद्देशाने सुरु झालेल्या डोंबिवलीतील यअंकुरय या सामाजिक संस्थेचे भविष्यात वटवृक्षात रुपांतर होऊ दे असा आशीर्वाद ङ्गआईङ्घ वृद्धाश्रमातील आजी-आजोबांनी दिला.

डोंबिवलीतील आगरी महोत्सवात महाराष्ट्र केरळ संस्कृती दर्शन

डोंबिवली,दि.६(वार्ताहर)-गेली १४ वर्षे आगरी महोत्सव माध्यमातून ‘आगरी संस्कृती’चा इतिहास मांडण्यात आगरी युथ ङ्गोरमने यशस्वी वाटचाल केली.

कडक उन्हामुळे अंबरनाथला रूळही वाकले; वाहतूक विस्कळीत

अंबरनाथ, दि.२७(वार्ताहर)-गेल्या दोन ते तीन दिवसांपासून तापमानामध्ये झालेल्या वाढीच्या फटक्याची झळ रेल्वेलाही बसली आहे आज दुपारी पडलेल्या कडक उन्हामुळे रूळ वाकल्याचा प्रकार घडल्याने रेल्वे वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती.

पिण्याच्या पाण्यासाठी मनसेचे ठिय्या आंदोलन

अंबरनाथ,दि.२६(वार्ताहर)-आठवड्यातून एक दिवस सुरु असलेली पाणी कपात भरीसभर म्हणून अपुर्‍या आणि अनियमित वेळेमध्ये होणार्‍या पाणीपुरवठ्यात ताबडतोब सुधारणा करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अंबरनाथला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण खात्

उल्हासनगरात आज रिक्षांचा कडकडीत बंद

उल्हासनगर,दि.५(वार्ताहर)-वारंवार निवेदन दिल्यावरही खड्डे भरण्याबाबत उदासीनता दाखवणार्‍या पालिकेच्या विरोधात रिक्षा युनियनचे नेते एकवटले आहेत.

बेकायदा बांधकामे: महापौर-आयुक्तांमध्ये ठिणगी!

उल्हासनगर,दि.२(वार्ताहर)-महापौर मीना आयलानी यांनी उल्हासनगर मनपाच्या सर्वसाधारण सभेत शहरातील अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई करू नये असे आदेश दिले होते मात्र कोणत्याही परिस्थितीत अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई होणारच असे आयुक्त राजेंद्र

नगराध्यक्षपदासाठी बदलापुरात राजकीय हालचालींना वेग

बदलापूर,दि.५(वार्ताहर)- बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष निवडीच्या पोर्शभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत नवीन नगराध्यक्षांची निवड होणार आहे.

खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते बदलापुरात शववाहिनीचे लोकार्पण

बदलापूर,दि.२२(वार्ताहर)-भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या खासदार निधीतून कुळगाव-बदलापूर नगरपालिकेला देण्यात आलेल्या शववाहिनीचे आज लोकार्पण करण्यात आले. सुमारे ११ लाख रुपयांची ही शववाहिनी आजपासून गरपालिकेच्या ताफ्यात दाखल झाली.

ओखीबद्दल भिवंडीत तातडीच्या सुविधा

भिवंडी,दि.6(वार्ताहर)-ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसल्यास आपत्कालीन स्थिती उद्भवू नये आणि उद्भवल्यास काय दक्षता घेणे आवश्यक आहे याचा विचार करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी विभाग प्रमुखांची तातडीची बैठक घेतली.

भीषण आगीत १६ गोदामे खाक

भिवंडी दि.६(वार्ताहर)-भिवंडी तालुक्यातील ओवळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात बांधण्यात आलेल्या सागर कॉम्प्लेक्स या गोदाम संकुलातील चेक पॉईंट या गोदामाला लागलेली आग पसरून जवळची १६ गोदामे आगीत भस्मसात झाली. आज सकाळी ९.३० वाजता ही घटना घडली.

धर्माने स्वतःला संपवले; सावित्रीबाईंचे काय होणार?

शहापूर,दि.३१(राजेश जागरे)-धुळ्यातील ८४ वर्षीय धर्माजी पाटील या शेतकर्‍याने अन्यायाविरोधात दाद मागत विषप्राशन करून मंत्रालयासमोर जीवन संपवले.

दोन फुटी खड्डे, म्हणे... शहापुरात खड्डेच नाहीत

शहापुर,दि.६(वार्ताहर)-प्रशासन अधिकाधिक गतिमान व लोकाभिमुख विशेषतः पारदर्शी होण्याच्या उदात्त हेतुने मोबाईल अथवा संगणकाच्या माध्यमातून नागरिकांना ऑनलाईन तक्रार दाखल करता यावी यासाठी आपले सरकार-तक्रार निवारण प्रणाली या पोर्टलची निर्मिती करण्यात आली,

अतिक्रमणे तोडायला गेलेल्या पथकावर हल्ला

नवी मुंबई,दि.५(वार्ताहर)-कोपरखैरणे रेल्वे स्थानकाशेजारील जागेवरील अधिकृत झोपड्यांवर कारवाई करायला गेलेल्या सिडकोच्या पथकावर आणि पोलीस कर्मचार्‍यांवर येथील झोपडीधारकांनी दगडफेक केली, त्यात चार पोलीस कर्मचारी जबर जखमी झाले असून इतर सहा ते सात पोलीस

विमानतळ परिसरातील शाळांचे स्थलांतर पुढील वर्षापासून

नवी मुंबई,दि.२६(वार्ताहर)-आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उभारणीसाठी आणि इतर कामांसाठी एकूण १० गावांचे स्थलांतर पुनर्वसन आणि पुन:स्थापना योजनेअंतर्गत पुनर्वसन आणि पुन:स्थापना क्षेत्रांमध्ये (पॉकेटस्) करण्यात येत आहेत.

भोईर दाम्पत्याच्या सेनाप्रवेशामुळे भाजपात जल्लोष; सेनेत नाराजी

भाईंदर,दि.९(वार्ताहर)-यंदाच्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या पोर्शभूमीवर बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक राजू भोईर व नगरसेविका भावना भोईर या दांपत्याला प्रभाग १६मध्ये भाजपातून उमेदवारी देण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू झाले होते.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मांडली स्वतंत्र चूल

भाईंदर,दि.५(वार्ताहर)-राष्ट्रवादीत सक्षम नेतृत्वाचा अभाव निर्माण झाल्याने कॉंग्रेसने येत्या मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीसोबत आघाडी न करता सर्व जागा स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

खापरी शाळा पडू लागली ओस

मुरबाड,दि.13(वार्ताहर)-तालुक्यातील खापरी शाळेची इमारत मोडकळीस आली असून शाळेला जाणारा रस्ताही नाही. विशेष म्हणजे या शाळेच्या काही अंतरावरच दोन शाळा सुरू झाल्याने खापरी शाळेतून दाखल घेऊन विद्यार्थी दुसर्‍या शाळेचा रस्ता धरू लागले आहेत.

‘दारुबंदी’ लघुचित्रपटाचे मुरबाड येथे प्रदर्शन

मुरबाड,दि.२६(वार्ताहर)-तालुक्यातील एस एस जी पी प्रॉडक्शन निर्मित व गर्जा कलामंच, मुरबाड प्रस्तुत दारुबंदी या मराठी लघुचित्रपटाचा प्रदर्शन सोहळा रविवारी क्रांती टॉकीज मुरबाड येथे मान्यवर, व कलावंताच्या उपस्थितित संपन्न झाला.