Welcome to Thane Vaibhav

कृष्णकुंजबाहेरच बसणार फेरीवाले

मुंबई,दि.१६(वार्ताहर)-फेरीवाल्यांवरुन राज्यभरात आंदोलन छेडणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेरच आता फेरीवाले बसणार आहेत. फेरीवाला धोरणानुसार हॉकर्स झोन तयार करण्यात आले असून त्यापैकी एक हॉकर्स झोन हा राज ठाकरे यांच्या घरासमोर आणि घराच्या मागच्या बाजूला असणार आहे.

आणखी वाचा

आयुक्त संजीव जयस्वाल यांना संस्कृती शिवगौरव पुरस्कार

ठाणे,दि.१६(वार्ताहर)-ठाणे शहरासाठी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल संस्कृती युवा प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात येणारा पहिला पुरस्कार महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना देण्यात आला. उपवन संस्कृती आर्ट फेस्टीव्हलच्या समारोप समारंभात हा पुरस्कार श्री.जयस्वाल यांना प्रदान करण्यात आला.

आणखी वाचा

बदलापूरचा अक्षय राठोड ठरला स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया

बदलापूर,दि.१६(वार्ताहर)-तामिळनाडू येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अनइकुब पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरच्या अक्षय राठोड याने ५३ किलो वजनी गटात स्कॉट प्रकारात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. ४५० किलो वजन उचलत त्याने सुवर्णपदक मिळवले. त्याने तिसर्‍यांदा नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

आणखी वाचा
1
2
3

No front page content has been created yet.

राष्ट्रवादीचे कल्याण; पंचायत मात्र सेनेची

कल्याण,दि.८(वार्ताहर)-पंचायत समिती सभापती निवडणुकीत शिवसेनेची पंचायत झाली असून निवडणुकीत एकत्र लढणार्‍या राष्ट्रवादीने सभापती पदाच्या आमिषाला बळी पडत शिवसेनेची साथ सोडली आहे. सत्तेच्या या राजकारणात भाजपा सरशी ठरली आहे.

चवताळलेल्या सैनिकांची पोलीस ठाण्यावर धडक

कल्याण,दि.४(वार्ताहर)-भीमा-कोरेगाव प्रकरणी कल्याणात बुधवारी आंदोलकांनी शिवसेना शाखेची तोडफोड केली होती. यावेळी दोन्ही गट आमने-सामने आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार करत २२ शिवसैनिकांना ताब्यात घेतले.

फेरीवाल्यांचा पालिकेच्या डोंबिवली विभागीय कार्यालयावर ४ फेब्रुवारीला मोर्चा

डोंबिवली,दि.३१(वार्ताहर)-भाजपाने नागरिकांना अच्छे दिनचे गाजर दाखविले होते. ज्यांच्या सांगण्यावरून आपण भाजपला मतदान केले ते देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेशी कंपन्यांना आपल्या देशात व्यवसाय करण्यासाठी बोलावीत आहेत.

डोंबिवलीकर बाळंतीणीच्या पोटात २२ दिवस राहिला कापसाचा गोळा

डोंबिवली,दि.२९(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या वैद्यकिय आरोग्य उपक्रमातील शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये चालणार्‍या बेजबाबदारपणाचा कारभार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चव्हाट्यावर आणला.

अनधिकृत बांधकामे थांबविण्याचे प्रभाग अधिकार्‍यांना आयुक्तांचे आदेश

उल्हासनगर,दि.२३(वार्तहर)-कल्याण-अंबरनाथ रस्तारुंदीकरणात तोडण्यात आलेल्या अतिक्रमणाच्या जागी बेकायदेशिरपणे उभ्या राहत असलेल्या अनधिकृत इमारतींची पालिका आयुक्त मनोहर हिरे आणि उपायुक्त नितिन कापडणीस यांनी पाहणी करीत सदर बांधकाम धारकांवर एमआरटीपी अंतर

शहाड रेल्वे स्टेशन सुविधांपासून वंचित

उल्हासनगर,दि.२२(वार्ताहर)-शहाड रेल्वे स्टेशनमध्ये घाणीचे साम्राज्य वाढले असून याकडे रेल्वे प्रशासन लक्ष देत नसल्याने नागरिक सुविधांपासून वंचित आहेत.

भिवंडी महापालिका कार्यक्षेत्रातील करदात्या रहिवाशांना संघटीत होण्याचे आवाहन

भिवंडी,दि.९-भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात राहणार्‍या रहिवाशांनी विविध करांच्या रकमा भरूनसुद्धा प्रशासनाकडून नागरी सोयीसुविधा उपलब्ध होत नाही. सोशिक रहिवाशी म्हणून प्रशासन त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.

कोन येथे पत्रकारास धमकी; आरोपी गजाआड

भिवंडी,दि.९(वार्ताहर)-भिवंडी तालुक्यातील कोन ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाचे वृत्त प्रसिद्ध केले म्हणून स्थानिक पत्रकार सिद्धार्थ कांबळे यांच्या घरात शिरून आणि धक्काबुक्की करून ठार मारण्याची धमकी दिली.