Welcome to Thane Vaibhav

जमीन हस्तांतरणाला वेग; ठाण्याची कोंडी फुटणार !

ठाणे,दि.16(वार्ताहर)-जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कक्षेतील विविध प्रलंबित प्रकरणे, विशेषतः प्रकल्पांना आवश्यक जमिनींचे हस्तांतरण लवकरात लवकर करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी आणि ठामपा प्रशासनाच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला.

आणखी वाचा

No front page content has been created yet.

कल्याण-डोंबिवलीची होणार कचराकोंडी

कल्याण,दि.16(वार्ताहर)-कल्याण डोंबिवली महापालिकेच्या 400 कंत्राटी सफाई कामगार आणि घंटागाडी वाहन चालकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. ठेकेदाराने तीन महिने पगारच दिला नसल्याने उद्या बुधवारपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

कल्याणात लेप्टोने घेतला दुसरा बळी !

कल्याण,दि.4(वार्ताहर)-काही दिवसापूर्वी टिटवाळ्यात एका महिलेला लेप्टोस्पायरोसिस या आजाराने जीव गमवावा लागला होता. यानंतर कल्याणात या आजाराने दुसरा बळी घेतला आहे. ज्योती यादव (14) असे या मुलीचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

एमआयडीसीला भोके पाडून बारवीची होते लूट

डोंबिवली,दि.३०(वार्ताहर)-बारवीची उंची आणि पाणीसाठा वाढूनही यंदा गतवर्षीपेक्षा पाणीसाठा कमी शिल्लक राहिला आहे. यामागे पाण्याची मागणी वाढल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

भाजपा नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन अनधिकृत फेरीवाले-बांधकामांविरुद्ध

डोंबिवली,दि.२७(वार्ताहर)-कल्याण-डोंबिवली महापालिका अंतर्गत डोंबिवली विभागीय कार्यालयातील फ प्रभागक्षेत्र आणि ग प्रभागक्षेत्रात अनधिकृत फेरीवाले आणि अनधिकृत बांधकाम होत आहे त्याला जबाबदार प्रशासन आहे.

पाण्याच्या टाकीवर रणरागिणींचा शोले

अंबरनाथ,दि.30(वार्ताहर)-मुसळधार पावसाने धरणे भरभरून वाहत असताना पिण्याचे पाणी मिळत नाही म्हणून संतप्त झालेल्या महिलानी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे ओशासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतरच महिलांनी आंदोलन मागे घेतले.

‘गल्फ’ची नोकरी ठरु शकते गुलामगीरी

अंबरनाथ,दि.२७(वार्ताहर)-आखातातील मोठ्या पगाराच्या आमिषाला बळी पडून कोणतीही पूर्ण माहिती नसताना परदेशी जाणे धोकादायक ठरु शकते. हे अंबरनाथमधील फरीदा खान या गुलामगिरीतून सुटका झालेल्या महिलेच्या प्रकरणातून निष्पन्न झाले आहे.

टाेईंगवरुन पाेलीस आणि वृध्दाची हाणामारी

उल्हासनगर,दि.११(वार्ताहर)-दुचाकी टोइर्ग करण्यावरून वाहन चालक आणि टोइर्ग कर्मचार्यांमध्ये वादाच्या ठिणग्या पडतच असून आज उल्हासनगरमध्ये याच कारणावरून वाहतूक पोलीस आणि ज्येष्ठ नागरिकामध्ये हाणामारी झाली.

उल्हासनगर स्थानक कार्यालयात डॉ. बाबासाहेबांना अभिवादन

उल्हासनगर, दि.६(वार्ताहर)-दीनदिलतांचे उद्धारकर्ते, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा ६१वा महापरिनिर्वाण दिन उल्हासनगर रेल्वे स्थानकातील स्थानकप्रमुख मनोहर पाटील यांच्या कार्यालयात साजरा करताना सर्वानी अभिवादन केले.

बदलापूरचा अक्षय राठोड ठरला स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया

बदलापूर,दि.१६(वार्ताहर)-तामिळनाडू येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय अनइकुब पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत बदलापूरच्या अक्षय राठोड याने ५३ किलो वजनी गटात स्कॉट प्रकारात राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. ४५० किलो वजन उचलत त्याने सुवर्णपदक मिळवले.

रुग्णालय आणि विद्यालयाचे राष्ट्रवादीने उरकले उद्घाटन!

बदलापूर,दि.३०(वार्ताहर)-गेल्या दोन वर्षांपासून बांधून पूर्ण असलेल्या पण उद्घाटनापासून वंचित असलेल्या बदलापूर गावातील सरकारी रुग्णालयाचे तसेच तंत्र विद्यालयाचे प्रतिकात्मक उद्घाटन राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज उरकले.

भिवंडीत ११ पैकी आठ ग्रामपंचायती भाजपाकडे

भिवंडी,दि.२७(वार्ताहर)-जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत भिवंडी तालुक्यातील काही भागात भाजपची पिछेहाट झाली असतानाच, भाजपने तालुक्यात पुन्हा मुसंडी मारली आहे.

जिल्ह्यात ६५ टक्के मतदान; भिवंडीत सेना-भाजपात राडा

ठाणे,दि.१३(वार्ताहर)-ठाणे जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील ५ तालुक्यातील ९३७ मतदान केंद्रांवर आज मतदान पार पडले. जिल्ह्यात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ५२.६५ टक्के मतदान झाले होते.

दूषित पाण्यामुळे झाला 25 जणांना अतिसार!

शहापूर,दि.5(वार्ताहर)-शहापूर तालुक्यातील तुते गावात दूषित पाण्यामुळे 25 जणांना अतिसाराची लागण झाली आहे.

जातीचा नव्हे, मातीचा अभिमान घेऊन मोठे व्हा- पंकजा मुंडे

शहापुर,दि.29(वार्ताहर)-विद्यार्थी म्हणून जातीचा नव्हे, मातीचा अभिमान घेऊन मोठे व्हा!

नोकर्‍याच नसतील तर आरक्षणाचा काय उपयोग?

नवी मुंबई,दि.5-जर सरकार नव्या नोकर्‍या निर्माण करणार नसेल तर आरक्षण मिळून देखील काय उपयोग होणार? असा उद्विग्न सवाल राज ठाकरे यांनी केला. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर त्यांनी सडकून टीका केली.

मुसळधार पावसातही नवी मुंबई तुंबत नाही!

नवी मुंबई,दि.10(वार्ताहर)-मुंबईची ‘तुंबई’ झाली असताना मुसळधार पावसातही नवी मुंबईचं जनजीवन सुरळीत आहे. महापालिकेने पाण्याचा निचरा करण्यासाठी 11 होल्डिंग पाँड आणि 192 मिलीमीटर पाईप बसवल्यामुळे पाणी तुंबत नसल्याचं समोर आलं आहे.

मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसातही ४७ टक्के मतदान!

भाईंदर,दि.२०(वार्ताहर)-मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ४७ टक्के मतदान झाले. गेल्यावर्षीपेक्षा यंदा दोन ते तीन टक्क्याने मतदान वाढू शकते. विशेष म्हणजे जोरदार पाऊस असतानाही मतदारांचा उत्साह कमी झाला नव्हता.

शिवसेना आणि भाजपातील तूतू-मैमैचा फायदा कॉंग्रेसला

भाईंदर,दि.१८(वार्ताहर)-मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीचे सूप वाजताच खर्‍या अर्थाने पक्षांतराला सुरुवात होणार असून त्यात वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही संघटना तर मोठ्या राजकीय पक्षात विलीन होण्याची दाट शक्यता सुद्धा निर्माण झाली आहे.

मुरबाडमध्ये रंगली मधुरांगणची मंगळागौर

मुरबाड, दि.२३(वार्ताहर)-प्रबोधनात्मक विचार जपून चौकटीला धक्का न लावता कला गुणांच्या माध्यमातून मुरबाड येथे सादर करण्यात आलेल्या मंगळागौरीच्या नाचाने मुरबाडच्या महिला मंत्रमुग्ध झाल्या.

मोरोशी आश्रमशाळेत ३८ विद्यार्थ्यांना विषबाधा

मुरबाड,दि.२१(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा मोरोशी येथील ३८ विध्यार्थ्यांना आज दुपारच्या सुमारास विषबाधा झाल्याची घटना घडली असून, सर्व विध्यार्थ्यांवर टोकावडे येथील शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.