Welcome to Thane Vaibhav

अग्निशमनची ठिणगी; हॉटेलवाल्यांनी भडका!

ठाणे,दि.२४(वार्ताहर)-अग्निशमनदलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेल्या हॉटेल आणि बार आस्थापनांना सील ठोकण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे, मात्र या आस्थापनांनीही आक्रमक भूमिका घेत राज्य शासनाच्या अग्निशमन विभागाच्या संचालकांनी काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेत कारवाईला विरोध केला आहे.

आणखी वाचा

९९ टक्के गृहसंकुलांना मिळते पोटभर पाणी!

ठाणे,दि.२४(वार्ताहर)- घोडबंदरमध्ये गेल्या पाच वर्षात २०९ गृहप्रकल्पांना वापर परवाना देण्यात आला असून त्यापैकी २०६ प्रकल्पांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू आहे. तर नवीन ६८ प्रकल्पांना ओसी दिली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेने न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे दिली.

आणखी वाचा
1
2

No front page content has been created yet.

बाप्पाचा परतीचा प्रवास रेल्वे रुळांवरून!

कल्याण,दि.६(वार्ताहर)-गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत मनोभावे पूजाअर्चा करून लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र हा परतीचा प्रवास करताना बाप्पांना देखील रेल्वेरूळ ओलांडून आपले स्थान गाठावे लागले.

पावसामुळे बकर्‍यांची आवक घटली

कल्याण,दि.१(वार्ताहर)-बकरी ईदनिमित्त तब्बल सात हजार बकर्‍यांची कुर्बानी दिली जाणार असून मुंबईला झालेल्या मुसळधार पावसामुळे बकर्‍यांची आवक घटली आहे. तर आवक कमी झाल्याने बकर्‍यांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

सुप्रसिद्ध सतार वादक पंडित रसिक हजारे यांचे निधन

डोंबिवली,दि.२१(वार्ताहर)-निष्णात सतार वादक आणि अखंड उत्साहाचा झरा म्हणून ओळख असलेल्या रसिक हजारे यांचे आकस्मिक निधन झाले. मृत्यू समयी ते ५८ वर्षांचे होते. भारतरत्न कै.

रिक्षा थांबा हटविण्यासाठी व्यापार्‍यांचे दुकान बंद आंदोलन

डोंबिवली,दि.२०(वार्ताहर)-डोंबिवली पूर्वेकडील केळकर रस्त्यावरील रिक्षा थांबा आणि परतीचे प्रवाशी सोडण्यामुळे संपूर्ण रस्ता रिक्षांनी अडविला जातो. त्यामुळे वाहनाच्या हॉर्न आणि धुरामुळे ध्वनी आणि वायू प्रदूषण होत आहे.

पूर्णिमा कबरे अंबरनाथ शहर भाजपच्या प्रभारी

अंबरनाथ,दि.१७(वार्ताहर)-भारतीय जनता पक्षाच्या ठाणे जिल्हा विभागीय उपाध्यक्षा पूर्णिमा कबरे यांची अंबरनाथ भारतीय जनता पार्टीच्या शहर प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

जॉगर पार्कची दुरावस्था; गवताचे साठले ढिगारे

अंबरनाथ,दि.१६(वार्ताहर)-सिमेंटच्या जंगलात उद्याने शिल्लक नाहीत आणि आहेत त्यांची दुरवस्था झाली आहे, अश्या परिस्थितीमध्ये अंबरनाथला उभारलेल्या जॉगर पार्कची दैनावस्था झाल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते.

कुष्ठपीडित बांधवांना महापालिकेचे अनुदान

उल्हासनगर,दि.१९(वार्ताहर)-आर्थिक दृष्टया दुर्बल घटक कुष्ठपीडित यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी महापालिकेतर्फे दरमहा देण्यात येणारे अनुदान स्थानिक नगरसेवक हस्ते करण्यात आले.

ध्वनी प्रदूषण जनजागृती पत्रकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन; अनेक नगरसेवक अनुपस्थित

उल्हासनगर,दि.१८(वार्ताहर)-सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायलय, शासन यांनी वारंवार ध्वनी प्रदूषणाबाबत माहिती घेत असल्याने पोलीस प्रशासन यासंदर्भात नेहमी बैठक आयोजित करून या सर्व प्रकारला आळा घालण्याचे काम करीत आहे, त्या अनुषंगाने नगरसेवकांसमवेत आयोजित

शिधापत्रिकेला लागणार आधारचा आधार

बदलापूर,दि.१६(वार्ताहर)-शिधापत्रिकाधारकांनी यापुढे आधार कार्डाचा आधार लागणार असून आधार पत्रिकेचा क्रमांक शिधापत्रिकेला जोडला तरच त्यांना शिधावाटप दुकानातून अनुदानित केरोसीन मिळणार आहे.

महारक्तदान शिबिराचे आयोजन

बदलापूर,दि.१२(वार्ताहर)-बदलापुरातील संकल्प सेवा समितीच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात असल्याची माहिती शिबिराच्या आयोजिका आणि नगरसेविका तनूजा गोळे यांनी दिली.

भिवंडीतील दुबार मतदारांचा तंटा सर्वोच्च न्यायालयात

भिवंडी,दि.१०(वार्ताहर)-भिवंडी महापालिका सार्वत्रिक निवडणूक मतदार याद्यांमध्ये ५० हजार ९२२ दुबार मतदार म्हणून नोंद करण्यात आलेली आहे. या प्रकरणी भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट यांच्या विद्यमाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

विलास पाटील यांचा अर्ज वैध; शरद पाटील जाणार न्यायालयात

भिवंडी,दि.९(वार्ताहर)-भिवंडी महापालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला सुरूवातीपासूनच ग्रहण लागलेले आहे. त्यामुळे दैनंदिन कामकाजात गोंधळी वातावरण निर्माण झालेले आहे. शिवाय विविध भागांत आठ निवडणूक निर्णय अधिकार्‍यांची कार्यालये थाटलेली आहेत.

येत्या अधिवेशनात ओबीसी मंत्रालयासंदर्भात अध्यादेश निघणार -आ. किसन कथोरे

शहापूर,दि.२७(वार्ताहर)-मागील महिन्यात शहापुरात झालेल्या कुणबी महोत्सवात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र ङ्गडणवीस यांनी घोषणा केलेल्या स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाचा अध्यादेश येत्या ६ मार्चपासून सुरू होणार्‍या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निघणा

खातिवलीच्या सरपंचपदी प्रकाश शिंदे यांची निवड

शहापूर,दि.१५(वार्ताहर)-तालुक्यातील महत्वाच्या खातिवली ग्रामपंचायतीच्या भाजपचे सरपंचपदी प्रकाश शिंदे यांची, तर उपसरपंचपदी देविदास जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीबद्दल शिंदे आणि जाधव यांचे तालुक्यातून अभिनंदन केले जात आहे.

प्लास्टिकमुक्त नवी मुंबई करीता सेलिब्रेटींसह नागरिकांचा अभियानातून जागर

नवी मुंबई,दि.८(वार्ताहर)-प्लास्टिकमुळे पर्यावरणाची आणि मानवी जीवनाची मोठ्या प्रमाणावर हानी होत असून भविष्यातील धोका लक्षात घेऊन यावर आजच नियंत्रण आणायला हवे.

बिल्डरच्या अंगावरील ५५ तोळे सोने लुटले

नवी मुंबई,दि.४-नवी मुंबईतील कामोठे येथे एका बिल्डरच्या अंगावरील ५५ तोळे सोनं आणि ६५ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. यामध्ये चैन, साखळी, ब्रेसलेट अशा दागिन्यांचा समावेश आहे.

उत्तनच्या डंपिंगला आग

भाईंदर,दि.22(वार्ताहर)-2008 पासून उत्तनच्या धावगी-डोंगरी परिसरात सुरू झालेले डंपिंग ग्राऊण्ड गेल्या काही वर्षापासून आगीनं धगधगत आहे.

राष्ट्रपुरूषांचा अपमान सहन करणार नाही

भाईंदर,दि.10(वार्ताहर)-पूर्वेकडील एका रस्त्याला दिलेले महात्मा फुले यांचे नाव बदलून त्याजागी थेट एका दिवंगत बिल्डरचे नाव देण्यात आल्याचा प्रकार शिवसेना सहन करणार नाही, ही चूक त्वरीत दुरूस्त न केल्यास त्याला विरोध केला जाईल, असा सज्जड इशारा आ.

म्हसा यात्रा शासकीय यंत्रणेसाठी ङ्गलदायी?

मुरबाड,दि.२२(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील तसेच राज्यातील प्रसिद्ध म्हसा यात्रा ही प्रशासनाला नेहमीच लाभदायी ठरते याचा अनुभव याही वर्षी पाहावयास मिळाला आहे. यात्रा म्हटली की मुरबाड तालुक्यातील सर्वच अधिकार्‍यांची चांदी होते.

नवनिर्वाचित पोलीस पाटील नियुक्तीपत्राच्या प्रतिक्षेत

मुरबाड,दि.१९(वार्ताहर)-मुरबाड तालुक्यातील महसुली गावातील ७२ पोलीस पाटीलपदांसाठी निवडप्रक्रिया पूर्ण होऊन दोन महिने उलटले, मात्र कल्याण प्रांत कार्यालयाकडून आजपर्यंत त्याना नियुक्तीपत्रक न मिळाल्याने कोणती माशी या प्रक्रियेत शिकंली याबाबत चर्चा सुर